डिझेल मेकॅनिक ट्रेड माहिती

डिझेल मेकॅनिक ट्रेड विषयीची संपूर्ण माहिती

Introduction of Trade (व्यवसायाची ओळख) :-

व्यवसायाचे नाव :- मेकॅनिक डिझेल
कालावधी :- एक वर्ष
शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास.

प्रशिक्षण काळात शिकविले जाणारे विषय

1.सैधांतिक (Theory)
2.प्रात्यक्षिक (Practical)
3.कार्यशालेय गणित व शास्त्र (Workshop Calculation & Science)
4.अभियांत्रिकी चित्रकला (Engineering Drawing)
5.एम्पलॉयबिटी स्किल (Employbility Skill)

Course Content in the syllabus :-
अभ्यासक्रमामध्ये इंजिन, कुलिंग लुब्रीकेशन, इनटेक आणि एक्झॉस्ट, फ्युएल सिस्टिम, इंजिन इमीशन, चार्जिंग आणि स्टार्टिंग सिस्टिम, इत्यादींचा समावेश होतो.
औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवसायाचे वेगवेगळे वैशिष्ट्ये असते. मेकॅनिक डिझेल या व्यवसायामध्ये प्रशिक्षण काळात विविध टूल्स व साधणे, कच्चे मटेरियल, पार्टस् ओळखणे. इंजिनचे भाग खोलणे, स्वच्छ करणे, पार्टचे निरिक्षण करणे, पार्टस् चेक करणे, पार्टस खराब असल्यास दुरुस्त करणे किंवा बदलणे, पुन्हा पार्टस् जोडणे व टेस्ट करणे. तसेच इंजिनमधील दोष शोधून त्यावर योग्य तो उपाय करणे व इंजिन संबंधी इतर कामे करणे इत्यादी कौशल्य शिकवली जातात.
मोठ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या कौशल्यांचे कुशल कारागीर असतात व लहान गॅरेजमध्ये सर्व प्रकारची कामे मेकॅनिकला करावी लागतात. मेकॅनिकला काम करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यास कमवार सराव करावा लागतो. सराव करणे म्हणजे प्रात्यक्षिकचा अभ्यास करणे होय. या व्यवसायामध्ये मेकॅनिकला वापरावी लागणारी यंत्र सामुग्री, हत्यारे व साहित्य यांचा अभ्यास शिकविला जातो. त्या शिवाय हत्यारांचा व साहित्यांचा शास्त्रशुध्द पध्दतशीर व सुरक्षित उपयोग करुन इंजिनची दुरुस्ती कशी करावी याचाही अभ्यास शिकविला जातो. एकदा इंजिन दुरुस्तीचे कौशल्य आत्मसात झाले की त्याचा उपयोग कुठेही योग्य पध्दतीने करता येतो. या शिवाय फिटर, शिट मेटल वर्क, वेल्डर आणि इलेक्ट्रीकल या व्यवसायाचा अभ्यासक्रम शिकवला जातो.
मेकॅनिक डिझेल हा अभ्यासक्रम यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्याला शिकाऊ उमेदवार (Apprenticeship trainee) म्हणून कारखान्यात काम करण्याची संधी मिळते. हा कालावधी एक वर्षाचा असून तो पूर्ण झाल्यावर उमेदवारास सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळू शकते किंवा तो स्वतःचा व्यवसायही सुरु करु शकतो.

Importance of Mechanic Diesel Trade

मेकॅनिक डिझेल व्यवसायाचे महत्व :-
ऑटोमोबाईल क्षेत्रात मेकॅनिक कामाला अतिशय महत्व आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात निरनिराळे यंत्र भाग असतात. हे यंत्र भाग जरी मशिनद्वारे तयार होत असले तरी त्याची प्रत्यक्ष जोडणी, बांधणी व दुरुस्ती इ. प्रक्रिया करण्यासाठी मेकॅनिकची गरज असते. कितीही यांत्रिकीकरण झाले तरी जोडणी व दुरुस्ती या सारख्या प्रकिया मेकॅनिककडून केल्या जातात.
ऑटोमोबाईल श्रेत्रात झपाटयाने प्रगती होत आहे. दिवसे दिवस मोटारगाड्यांची संख्या वाढत आहे. मोटारगाडीच्या व्यवसायाने बाजारपेठेत जे स्थान मिळविले आहे. तेवढे स्थान इतर कोणत्याही व्यवसायाने मिळविले नाही. आज मोटारगाडी ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील एक प्रमुख घटक झाली आहे. या मोटार गाडीसाठी ‘डिझेल’ इंधनाची आवश्यकता असते. दिवसेदिवस पेट्रोलच्या किंमतीत होणारी वाढ व अधुन मधून पेट्रोलचा जाणवणारा तुटवडा यामुळे डिझेल इंजिनमध्ये सुधारणा घडवून जास्तीत जास्त डिझेल इंजिनवर चालणाऱ्या गाड्या लोकप्रिय होत आहेत. आज रस्त्यावरुन धावणारी वहाने पुर्वीपेक्षा फारच सुधारीत व सुखसोयीयुक्त अशी आहेत. डिझेल इंजिनचा वापर सध्या जगात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. उदा. जहाजे, रेल्वे, अवजड सामान उचलण्याची साधने, वीजनिर्मीती करणारे जनरेटर्स, पाणी खेचण्याचे पंप, बसेस, ट्रक, टेम्पो, जिप, कार इत्यादी वहानामध्ये डिझेल इंजिनचा वापर केला जातो. हल्ली तीन चाकी वहानावरही डिझेल इंजिनचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे डिझेल इंजिनची दुरुस्ती करणेसाठी मेकॅनिकची आवश्यकता असते. तसेच सर्व मोटारगाडयांची देखभाल व उत्पादन करणाऱ्या कारखान्यात सुध्दा मेकॅनिकचीच आवश्यकता असते. 

Scope of Mechanic Diesel Trade 

मेकॅनिक डिझेल व्यवसायाची व्याप्ती :-

मेकॅनिक डिझेल हा व्यवसाय एक वर्ष कालावधीचा आहे. कारागीर प्रशिक्षण योजने अंतर्गत (CTS) मेकॅनिक डिझेल हा व्यवसाय संपुर्ण देशभरात सर्वात लोकप्रिय आहे. 

1. मेकॅनिक डिझेल ट्रेडमध्ये वापरात येणाऱ्या विविध प्रकारची टुल्स, साधने, रॉ मटेरियल, स्पेअर्स ओळखणे, 

2. मेजरिंग, फिटिंग, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल तसेच हायड्रोलिक सिस्टिममधील दोष शोधणे व त्यावर उपाय करणे इत्यादींचा सराव करणे. 

3. डिझेल इंजिनचे विविध प्रकारची दुरुस्ती करण्याचा सराव करणे. 

4. लुब्रीकेशन सिस्टिम, कुलिंग सिस्टिम, फ्युएल सिस्टिम, स्टार्टिंग सिस्टिम आणि चार्जिंग सिस्टिममधील दोष शोधणे व त्यावर उपाय करणे इत्यादींचा सराव करणे. 

करियर प्रगतीचे मार्ग :-

1. उद्योगांच्या विविध प्रकारच्या अप्रेंटिसशिप प्रशिक्षण व राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र (NAC) यांच्या प्रशिक्षणामध्ये सामील होऊ शकता. 

2. काफ्टस्मन प्रशिक्षक प्रशिक्षण योजनेत (CITS) आय. टी. आय. मध्ये शिक्षक होण्यासाठी सामील होऊ शकता. 

Job Opportunities (नोकरीची संधी) :-

मेकॅनिक डिझेल हा कोर्स पुर्ण केल्यानंतर खालील ठिकाणी प्रशिक्षणार्थ्याना नोकरीची संधी उपलब्ध आहे. 

1. केंद्र शासन व राज्य शासनच्या आस्थापनेमध्ये जसे रेल्वे, एअर पोर्ट, मरीन, मिलीटरी, D.R.D.O., I.S.R.O., B.A.R.C., Indian Ordnance Factory इत्यादीमध्ये मेकॅनिक टेक्निशियन म्हणून जॉब करु शकता. 

2. अॅग्रीकल्चर मशीनरी, ट्रक, बस, कार, स्टेशनरी इंजिन, कॉम्प्रेसर, डिझेल जनरेटर इत्यादीच्या डिलरकडे सर्व्हिस टेक्निशियन म्हणून जॉब करु शकता. 

3. एस टी महामंडळ, खाजगी कारखाने आणि लहान-मोठे उदयोगधंदयामध्ये मेकॅनिक, टेक्निशियन, असेब्ली फिटर, मेंटेनन्स मेकॅनिक म्हणून नोकरी मिळू शकते. 

4. C.I.T.S. चा कोर्स पुर्ण केल्यानंतर आय.टी.आय. मध्ये शिल्प निदेशक म्हणून नोकरी मिळू शकते. 

5. परदेशात रोजगाराची संधी मिळू शकते. 

स्वयंरोजगारची संधी :-

प्रशिक्षणार्थी स्वतःचा वर्कशॉप काढून स्वतंत्र व्यवसाय ही आत्मविश्वासाने करु शकतो. 

1. ग्रामीण व शहरी भागात डिझेल इंजिनचे सर्व्हिस सेंटर 

2. पेट्रोल इंजिनची दुरुस्ती 

3. मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्टर 

4. सर्व्हिसींग सेंटर 

5. इंजिनची एजेन्सी किंवा डिलरशीप 

6. इंजिन पार्टस्ची सेवा, दुरुस्ती व देखभाल 

7. स्वतःचे इंजिन दुरुस्तीचे गॅरेज 

8. सिलिंडर हेड दुरुस्ती 

9. एफ आय पंप दुरुस्ती 

10. सिलिंडर लायनर रिबोअरिंग 

11. कॅकशाफ्ट गांईंडिंग इत्यादी 

वरील व्यवसाय करण्यासाठी जिल्हा उदयोग केंद्राकडून कर्ज मिळू शकते.

तेंव्हा आजच विनायकराव मेटे शासकीय आय टी आय मध्ये संपर्क साधा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *