कै. विनायक राव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड मधील शॉर्ट टर्म कोर्सेस

बीड शहर व  जिल्हा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आता शोर्ट टर्म कोर्सेस ची सुवर्णसंधी. हे सर्व कोर्सेस NATIONAL COUNCIL OF VOCATIONAL EDUCATION AND TRAINING (NCVET) व dgt दिल्ली मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे यामध्ये यशस्वीपणे पूर्ण केलेल्या प्रशिक्षनार्थ्याना सर्टिफिकेट प्राप्त होईल. जे संपुर्ण जगात मान्यताप्राप्त आहे.  

सीएनसी टर्निंगमधील सर्टिफिकेटसह उज्ज्वल भविष्याची दारे उघडा

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागातर्फे तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे, आधुनिक उत्पादन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी सीएनसी टर्निंगमधील सर्टिफिकेट कोर्स (CSC/Q0115) सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला ‘कॅपिटल गुड्स’ उद्योगात उत्तम प्रदर्शन करण्यासाठी लागणारे व्यावहारिक कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान प्रदान करतो. अधिक माहितीसाठी वर फोटो वर क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाकडून घ्या फिटर-फॅब्रिकेशनचे प्रमाणपत्र (Certificate Course in Fitter-Fabrication) | कौशल्य विकासाची सुवर्णसंधी

नमस्कार मित्रांनो, आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात एक उत्तम नोकरी किंवा स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी तांत्रिक कौशल्ये (Technical Skills) खूप महत्त्वाची ठरत आहेत. या गरजेला धरून, महाराष्ट्र शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळ (MSBSVET) एक उत्कृष्ट अवसर घेऊन आले आहे. तो म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन फिटर-फॅब्रिकेशन (CSC/Q0303). अधिक माहितीसाठी फोटो वर क्लिक करा.

मोफत सोलर पॅनेल इंस्टॉलेशन टेक्निशन कोर्ससाठी प्रवेश सुरू | महाराष्ट्र शासनाची योजना

नमस्कार वाचकांनो, सोलर उर्जा ही भविष्याची उर्जा आहे! देशात सोलर ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे, ज्यामुळे सोलर टेक्निशन्सची मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाली आहे. ही लाट घेऊन येत आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागातर्फे. शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने (MSBSVET) एक उत्तम अल्प-मुदतीचा कोर्स सुरू केला आहे. तो म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन सोलर पॅनेल इंस्टॉलेशन टेक्निशन (ELE/Q5901). हा कोर्स तरुणांना भविष्यातील हुन्नर शिकण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. चला, या कोर्सचा थोडक्यात आढावा घेऊ. अधिक माहितीसाठी फोटो वर क्लिक करा.