प्रवेश प्रक्रिया 2025 सत्रासाठी कै. विनायक राव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड सज्ज आहे. खालील व्यवसाय निहाय जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
प्रवेश इच्छुिक उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म व आवश्यक ते शुल्क भरून त्याची एक प्रत व आवश्यक ते कागदपत्र (ओरीजनल / झेरॉक्स) घेऊन नजीकच्या औ.प्र. संस्थेत तो फॉर्म कन्फर्म करून घ्यावा तद्नंतरच आपण प्रवेशासाठी पात्र राहु शकता व त्यानंतर पंसतीक्रम द्यावा.
वरील दर्शविलेले व्यवसायास प्रवेश घेतेवेळी उमेदवाराने अर्जात नमुद केलेले मुळ कागदपत्रे व त्यांच्या दोन छायांकित प्रति व दोन अलिकडच्या काळातील फोटो, आधारकार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे सोबत आणावित, अधिक माहितीसाठी admission.dvet.gov.in या वेबसाईटवर अधिक माहिती घ्यावी.
प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना रू.५००/- महिना विद्यावेतन
* संस्थेतील मार्गदर्शन कक्ष क्रं. *
श्री. सगळे एच. आर. Mo.9673670823
श्री. कळसकर एस.यु. Mo.9922535713
एक वर्ष कालावधीचे ट्रेड:
| अनु. क्र . | ट्रेडचे नाव | उपलब्ध जागा | |
| 1. | वेल्डर | 80 | |
| 2. | डिझेल मेकॅनिक | 48 | |
| 3. | कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) | 48 | |
| 4. | डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर | 24 | |
| 5. | पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (एक तुकडी अल्पसंख्यांक साठी ) | 40 | |
| 6. | प्लंबर | 48 | |
| 7. | बिल्डिंग कन्स्ट्रक्शन | 24 | |
| 8. | वूड वर्क टेक्निशियन (कारपेंटर ) | 24 | |
दोन वर्ष मुदतीचे व्यवसाय :
| अनु. क्र . | ट्रेडचे नाव | उपलब्ध जागा | |
| 1. | टर्नर | 40 | |
| 2. |
फिटर |
40 |
|
| 3. | मोटर मेकॅनिक व्हेईकल | 24 | |
| 4. | मशिनिस्ट | 40 | |
| 5. | पेंटर जनरल (अल्पसंख्यांक साठी ) | 20 | |
| 6. | इलेक्ट्रिशियन | 60 | |
| 7. | वायरमन | 20 | |
| 8. | इलेक्ट्रोनिक मेकॅनिक | 24 | |
| 9. |
मेकॅनिक मशीन टुल मेंटेनन्स |
24 | |
| 10 |
ड्राफ्टसमन मेकॅनिकल |
20 | |
| 11 |
ऑपरेटर अडवांस मशीन टुल |
16 |
प्रवेश प्रक्रिया 2025 साठीचे वेळापत्रक
महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०२५ सत्रासाठी प्रवेश सूचना
ITI Admission Portal: https://admission.dvet.gov.in
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२५ सत्रातील प्रवेश है केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर माहितीपुस्तिका-प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” दि. १५ मे २०२५ पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि. १५ मे २०२५ पासून रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा, प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय वा खाजगी औ.प्र. संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा. सदर मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासा.
-: अर्ज करण्याची पध्दत :-
१. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रीयेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्विकृती केंद्र असतील. अर्ज स्विकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे / पडताळणी / स्विकृती आणि निक्षिती करु शकतील
२. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.
३. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातुन भरता येईल. सर्व औ.प्र. संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ४. प्रदेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर) नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल.
4. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही.
5. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) (यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल.
६. उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन “Admission Activities” या मथळ्याखाली “Application Form” वर क्लिक करुन संपुर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनश्चः तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातुन जमा करावे.
७. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर व प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येईल.
८..प्रवेशअर्ज शुल्कः
९.१ राखीव प्रवर्ग (Heserved Category): .100/-
९.२ अराखीव प्रवर्ग (Unreserved Category): रु.150/-
९.३ महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Dutside Maharashtra State): रु.300/-
९.४ अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु.500/-
१०. प्रवेश अर्ज निश्चित करणे (Confirmation):. उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची (Provisional Application Form) छापील प्रत (Print Out) घ्यावी.
१०.१. प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती/ दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक मुळ दस्तऐवज / कागदपत्रे, कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीचा (Photocopy) एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out) नजिकच्या औ.प्र. संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर Download या मथळ्याखाली तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
१०.२. अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी हे अर्जात नमुद केलेल्या माहितीची उमेदवाराने सादर केलेल्या मूळ दस्ताऐवजावरुन काळजीपूर्वक तपासणी करतील. आवश्यक असल्यास उमेदवारास त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवज / कागदपत्रांप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश देत्तील. तपासणीनंतर अर्जाचे निश्चितीकरण करुन उमेदवारास “अर्ज निश्चितीकरण पावती (Application Confirmation Slip) व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची (Confirmed Application Form) प्रत देतील,
१०.३. अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मुळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करतील.
१०.४. उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित्त करण्यासाठी औ.प्र. संस्थेस कोणतेही शुल्क देय नाही,
१०.५. प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औ.प्र. संस्था मुळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरीत मदत कक्षास संपर्क साधावा.
११. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेन्यांकरिता विचार करण्यात येईल. निक्षित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल
१२ . प्रदेश अर्ज निक्षित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातिल माहितीत बदल करता येणार नाही. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणात्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करून तसा बदल करता येईल. तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
१३. प्रवेश अर्ज निक्षित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राचान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration Number) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/ Change Options/ Preferences” व्दारे सादर करावेत.
१४. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर Option Form पी छापील प्रत (Print Out) घ्यावी.
१५. उमेदवाराने एकच अर्ज भरावा, एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेतुन बाद होईल.
१६. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखिल दि. १५ मे २०२५ पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे.
१७. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र (Allotment Letter) Online उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या Account ला Login करुन निवडपत्राची प्रिंट घेवून निवड झालेल्या औ.प्र. संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे. उमेदवारांना निवळपत्राची (Alatment Letter) छापील प्रत (Print Cut) ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत देखिल घेता येईल.
१८. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करतांना प्रवेश अर्जातिल दान्यांच्या पृष्ठवर्थ आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे संबंधीत संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची मादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध करुन देण्यात आली आहे, प्रवेश निद्धितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे सादर करु न शकल्यास च/बा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेल्यांतून बाद करण्यात येईल.
१.० ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे
-: प्रवेशाचे वेळापत्रक :-
प्रवेश प्रक्रीयेचा तपशील
१.१ ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे.
२.० २.१ अर्ज स्विकृती केंद्रात (राज्यातील शासकीय वा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित १५ मे, २०२५
प्रवेश अर्ज निश्चित करणे प्रारंभ दिनांक : १५ मे २०२५
(Confirmation) करणे
२.० पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे
२.१ प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर २६ मे, २०२५
नोंदणी क्रमांक (Registration No.) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन सादर करणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ यांच्याव्दारे इ.१० वी ची गुणपत्रिका संबंधीत शाळांमार्फत वितरीत करण्यात आल्यावर प्रवेशाचे
सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल.
-: महत्वाची सुचना :-
१. उमेदवाराने त्याच्या प्रवेश खात्याचा (Admission Account) पारावर्ड (Password) कोणासही देऊ नये व त्यासंबंधी संपूर्ण गोपनीयता पाळावी. Password
विसरल्यास तो Reset करण्याची सुविधा प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
२. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) अंतर्गत राज्यात असलेल्या २५० औ.प्र.संस्थांमधील सर्व अभ्यासक्रमातील २०% जागा या माहिती पुस्तिकेत दिलेले “विशेष प्रशिक्षण शुल्क” आकारुन गुणवत्तेनुसार मरण्यात येतील. त्या जागांसाठी इच्छुकांना Online प्रदेश प्रक्रीयेत स्वतंत्र विकल्प (Option) देण्याची मुभा राहणार आहे. उदा. Fitter-IMC, Welder-IMC, eto, उमेदवारांनी अशा जागांसाठी विकल्प सादर करण्यापूर्वी माहितीपुस्तिकेत प्रशिक्षण शुल्काबाबत (मुद्दा क्र. १५.१) माहिती
वाचाची, ३. शासकीय औ.प्र. संस्थांमधील पब्लिक प्रायवेट पार्टनशिप (पीपीपी) योजनेंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागा (IMC Seats) व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण
संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश देण्यात येणान्या जागांवर प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ८० ते १००% व्यवसाय प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे. व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत दिले जाणारे लाभ, योजनेसाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे या बाबत सविस्तर माहिती माहिती पुस्तिकेत व प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
४. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या शासकीय औ. प्र. संस्थांमधील व्यवसायांत एकूण प्रवेश क्षमतेच्या ५०% पेक्षा कमी प्रवेश झाले असतील अशा व्यवसायातील प्रवेशित उमेदवारांना त्याच संस्थेत इतर व्यवसायात किंवा जवळच्या दुसऱ्या शासकीय औ.प्र. संस्थेतील संबंधित व्यवसायात सामावून घेण्यात येईल. (माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्र. २२.१)
५. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांतील सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने होत असून केंद्रीय पध्दतीत उपलब्ध जागा व संस्थास्तरावरील जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवार, पालक व औ.प्र. संस्थांनी नोंद घ्यावी.
५. केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेत सहभागी खाजगी औ.प्र. संस्था व त्यातील व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्या हया कायम विनाअनुदानित तत्वावर शासन मान्यताप्राप्त व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परीषद (NCVT) यांचेशी संलग्न आहेत. या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांमधील प्रवेशित व प्रशिक्षण घेणान्या उमेदवारांची परीक्षा अखिल भारतीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा (AITT) ही शासकीय औ.प्र. संस्थांतील उमेदवारांप्रमाणेच घेण्यात येवून उत्तीर्ण उमेदवारांना राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (NTC) बहाल करण्यात येते. उमेदवारांनी खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये संस्थास्तरावरील जागांसाठी प्रवेश घेण्याअगोदर, ते ज्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकडीत प्रवेश घेत आहेत ती व्यवसाय अभ्यासक्रमाची तुकडी NCVT शी संलग्नीत आहे का ते NCVT-MIS पोर्टल www.novtmis.gov.in वर II Search या मथळ्या खाली तपासावे. असंलग्नीत व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकडीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची परीक्षा संचालनालयामार्फत घेण्यात येणार नाही.
राज्यातील सर्व शासकीय व मान्यता प्राप्त खाजगी औ.प्र. संस्था व या संस्थेतील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी https://admission.dvet.gov.in, www.dvet.gov.in तसेच www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळांवर देखिल उपलब्ध आहे. तरी प्रवेशोच्छुक सर्व उमेदवारांनी सदर संकेतस्थळांना एकवेळ अवश्य भेट दयावी.
८. वरील प्रवेश वेळापत्रक सूचक दर्शक असून त्यात बदल संभवतो. अद्ययावत प्रवेश वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना SMS व्दारे वेळोवेळी कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रिये दरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट देणे त्यांचे हिताचे राहील.